‘उगम’ शाश्वत शेती उपजिवीका प्रोत्साहन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे काम पुर्णत्वाकडे

Image

उगम ग्रामीण विकास संस्था उमरा ता.कळमनुरी जि.हिंगोली येथे जापान कॅान्सुलेट च्या जी.जी.पी.(Grasroots Grand Programme) या कार्यक्रमाअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतुन प्रशिक्षण केंद्राची उभारणी होत असुन लवकरच या अदयावत केंद्राचे उदघाटण होणार आहे.

शाश्वत उपजिवीकेशी निगडीत प्रशासन व्यवस्थापन, ग्रामीण विकास, आपत्ती व्यवस्थापन, संशोधन व दस्ताएैवजीकरण, सामाजिक न्याय व माहितीचा अधिकार, स्पर्धा परिक्षा पुर्वतयारी प्रशिक्षण, मानव संसाधन विकास, महिला व बाल अधिकार, व्यक्तीमत्व व नेतृत्व विकास, संगणक प्रशिक्षण, सेंद्रीय शेती, जैविक किटक नाशक निर्मीती, ग्रामाद्योग कुटीर उद्योग, महिलांसाठी कायदेविषयक व उपजिवीका निगडीत कैाशल्य वाढ, पर्यावरण विकासात पानलोट क्षेत्र व्यवस्थापन, विहीर व बोअर पुर्नभरण, रेन वाटर हारवेस्टिंग, जैवविविधता प्रशीक्षण, पंचायतीराज सक्षमीकरण, गावसुक्ष्म नियोजन, पी.आर.ए. ग्राम स्वच्छता व बांधकामाशी निगडीत गवंडीकाम, सुतारकाम, बार बेंडींग, पेंटींग, इलेक्ट्रीक वायर फिटींग, शैाचालय  बांधकाम इत्यादी प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.

सदरील प्रशिक्षणे ही केंद्र व राज्य शासन यांचे विविध विभाग व योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, खादीग्राम बोर्ड, विविध आर्थीक विकास महामंडळे, नाबार्ड, विविध बॅंक यांच्या माध्यमातून युवक, युवती, शेतकरी महिला, शेतकरी, बचत गट, विविध समीत्या, आर्थीक व सामाजिक दुर्बल घटकांना सक्षम व स्वावलंबी बनविण्याकरीता कैाशल्य वाढ व व्यवसायभिमुख प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.

प्रशिक्षण केंद्रात एकाच वेळी वेगवेगळ्या प्रशिक्षण हॅाल मध्ये अनिवासी स्वरुपात ५०० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सोय असुन ५० महिला व ५० पुरुषांची निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्याचबरोबर सुसज्ज अशी ध्वणीप्रक्षेपण व बैठक व्यवस्था, एल.सी.डी.प्रोजेक्टर, व्हीडीओ कॅाफ्रसींग, अॅडीओ, व्हीडीओ, टिचींग व्यवस्था, सुसज्ज लायब्रेरी आणी मनोरंजन व ध्यानकेंद्र व्यवस्था असून साधन व्यक्तीची स्वतंत्र निवास व्यवस्था तसेच पाहुण्यांसाठी विश्रामगृह अशा व्यवस्था राहणार आहेत. केंद्रात प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थ्यांना भाेजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह तसेच एक हजार व्यक्तींची बैठक व्यवस्था असलेला भोजनकक्ष राहणार आहे. सोबतच मोठे मेळावे व शिबीर घेण्याकरीता स्टेज सहीत व्यवस्था हे या इमारतीचे वैशीष्ट्ये आहे.

साेबतच या प्रशिक्षणार्थ्यांना क्लासरुम सोबतच, पाणी व्यवस्थापण, शैाचालय, सेंद्रीय शेती, सोलाय या संबंधी प्रात्यक्षीक मिळण्याकरीता संस्थेच्या परिसरात विविध डेमो व सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील प्रशिक्षणे पुर्ण करण्यासाठी संस्थेने विविध क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी ५० प्रशिक्षकांचे नेटवर्क तयार केले असुन सर्व प्रकारचे प्रशिक्षण विविध योजना, शासन यांच्या माध्यमातुन व निधीतुन दिले जाणार आहे.

हे प्रशिक्षण केंद्र केवळ प्रशिक्षण देणार नसुन प्रशिक्षणानंतर संबंधीत प्रशिक्षणार्थी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीणे पाठपुरावा करुन आर्थिक योजना चा लाभ मिळवून देण्यासाठी वितीय संस्था व शासकिय योजनांची सांगड घालून जास्तीत जास्त स्वावलंबी उदयोजक घडवीण्यासाठी प्रयत्न करणार आहे ज्यासाठी दुर्बल घटक व गरीबांसाठी कुठल्याही प्रकारची फिस आकारल्या जाणार नाही.